Breaking
ब्रेकिंग

चौकशी कक्षासह स्वच्छता गृह कुलूपबंद..! प्रवाशांची गैरसोय, सेलूच्या बसस्थानकातील प्रकार

1 9 7 0 3 9

सचिन धानकुटे

सेलू : – स्थानिक बसस्थानकातील चौकशी कक्षासह स्वच्छता गृह उशिरापर्यंत कुलूपबंद राहत असल्याने प्रवांशाची मोठी तारांबळ उडते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत संबधिताला तसे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

      सेलू शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याठिकाणी तीन कोटी रुपये खर्चून नव्यानेचं बसस्थानक उभारण्यात आले. यामध्ये प्रवाशांसाठी सगळ्या सोयीसुविधांचा देखील समावेश करण्यात आला. परंतु याठिकाणी कर्तव्यावर असणारे वाहतूक नियंत्रक महाशय उशिराने उगवत असल्याने साऱ्यांनाच अडचणींना सामोरे जावे लागते. येथे सकाळी सहा ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री दहा अशा दोन पाळीत वाहतूक नियंत्रकाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील वाहतूक नियंत्रक वर्ध्यातून अपडाऊन करीत असल्याने आपल्या सोयीनुसार दाखल होतात. तोपर्यंत सगळा कारभार भगवानभरोसे चालत असतो. एखाद्या प्रवाशाला बसची चौकशी करायची असेल किंवा स्वच्छता गृह वापरायचे असल्यास वाहतूक नियंत्रक महाशय अवतरण्याची वाट पाहावी लागते. सदर प्रकार नित्याचीच बाब झाला आहे.

   आज सोमवारी येथील चौकशी कक्षासह स्वच्छता गृह सकाळी दहा वाजता पर्यंत कुलूपबंद होते. त्यामुळे प्रवाशांना तसेच चालक व वाहकांना देखील ताटकळत बसावे लागले. असा प्रकार नेहमीच घडत असल्याने याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी विशेषतः महिला प्रवाशांकडून होत आहे.

 

पगार आठ तासांचा अन् काम सहा तास

     याठिकाणी सुट्टीच्या दिवशी एक पाळी तर अन्य दिवशी दोन पाळीत वाहतूक नियंत्रकाची ड्युटी असते. पहिल्या पाळीतील कर्मचाऱ्याने सकाळी सहा वाजता येणे अपेक्षित आहे, मात्र दहा वाजून जाते तरी महाशय उगवत नाहीत. दुसऱ्या पाळीतील महाशय दोन वाजता उगवतात खरे.. परंतु रात्री दहा वाजतापर्यंत ड्युटी असताना आठ वाजताच टाळे ठोकून रफूचक्कर होतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रक शासनाचा पगार जरी आठ तासांचा घेत असले, तरी कर्तव्य मात्र चार किंवा सहा तासच बजावतात, हे विशेष..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे