Breaking
ब्रेकिंग

आधार फाउंडेशन महिला मंचच्या वतीने पाणी प्याऊचे शुभारंभ : महिला दिनाचे औचित्य साधून उपक्रमाचा प्रारंभ

1 9 7 0 7 1

हिंगणघाट :- उन्हाळयाची चाहुल लागताच उष्णतेची तीव्रता जास्तच जाणवू लागली. सरासरी पेक्षा जास्त तापमान वाढत असल्याने आरोग्याचा मंत्र लक्षात घेऊन पाण्याची शरीरातली पातळी कमी होऊ नये त्यासाठी वाटसरूंची तृष्णा भागविण्याकरिता प्याऊ म्हणजेच पाणपोई अत्यावश्यक सेवा ठरते .जुन्या काळापासूनच पानपोईचे विशेष महत्त्व आहे. दुकानात जरी बाटलीबंद पाणी मिळत असेल तरी तहान मात्र उदकातील पाण्यानेच जात असते .वाढत्या उन्हाचा तडाका लक्षात घेता पाण्याचे महत्व आणि वाटसरूंची गरज लक्षात घेता आधार फाउंडेशन महिला मंच द्वारा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्याऊ चे शुभारंभ करण्याचे ठरविले आहे. एक पाऊल माणुसकीकडे या मथळ्याखाली अतिशय स्तुत्य असा सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम उन्हाळयाभर राबविण्याचे ठरविले .या पाणी प्याऊचे शहरातील नंदोरी चौक येथे उद्घाटन श्रीमती अलका सोनवणे गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते तर श्रीमती लतिका बेलेकर माजी प्राचार्य प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

मान्यवरांनी आधार फाउंडेशनच्या उपक्रमाची प्रशंसा करत मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे आधार फाउंडेशन खऱ्या अर्थाने सार्थ करीत असे गौरवद्गार काढले अशी सेवाभावी व परोपकारी वृत्ती सर्वानी जोपासावी असे आवाहन त्यांनी केले
उपक्रमाची संकल्पना सौ. माधुरी विहीरकर यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केली तर संचालन कु.मयूरी देशमुख व आभार विरश्री मुडे यांनी मानले. या पाणी पिऊ च्या यशस्वी आयोजनासाठी माया चाफले, ज्योती धार्मिक ,वैशाली लांजेवार ,अनिता गुंडे, शुभांगी नायर, स्वाती वांदिले, प्रीती कलोडे, किरण निमट, आरती सोमवंशी ,कविता घोडे, रश्मी धायवटकर ,ममता चावट ,प्रणिता तपासे,ज्योत्स्ना बावणे ,ज्योती हेमने, नीता गजबे ,शगुफ्ता शेख, सुमन डांगरे,ज्योती कोहचाडे, मीनाक्षी फुलबांदे, संगीता नांदणे ,किर्ती सायंकार,विद्या गिरी ,सुचिता सातपुते ,अर्चना नांदुरकर, रजनी सुरकार ,उषा गुडघे,योगीता गावंडे,ज्योत्स्ना भगत, सविता राऊत, निर्मला निखाडे, अनुश्री कोपरे ,वैशाली हेडाऊ, सिंधुताई देशमुख ,निता भोयर,आधार फाउंडेशन चे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक, पराग मुडे,प्रा.डॉ. शरद विहीरकर,श्याम निमट, तुषार लांजेवार प्रा. गजानन जुमडे सुनील डोंगरे .सुरेश गुंडे राजू , मोघे ,रामराव मेहत्री, वसंत चावट, गजानन नांदूरकर,वासुदेव तडस,सचिन येवले,मनोज गायधने, जगदीश वांदीले आदीने सहकार्य केले या शुभारंभ सोहळयास परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे