Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक..! आतेभावाचा मामेभावावर गोळीबार, आरोपी गजाआड : नेमका चक्कर काय?

1 9 8 4 4 6

किशोर कारंजेकर

वर्धा : – आतेभावाने आपल्या सख्ख्या मामेभावावर गोळीबार करीत जिवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास शहराबाहेरील रिंगरोडवर घडली. या घटनेतील हर्षल लंकेश्वर झाडे(वय३२) रा. एलआयसी कॉलनी, नालवाडी असे जखमी मामेभावाचे तर राहुल हरिभाऊ वाघमारे(वय३०) रा. रेहकी(कला) असे आरोपी आतेभावाचे नाव आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांंतही जुन्या वादातून हा राडा घडल्याचे सांगितले जाते.

      मिळालेल्या माहितीनुसार, यातील जखमी हर्षल झाडे हा नालवाडी परिसरातील रहिवासी आहे. त्याच्याकडे काल रात्री आठ वाजताच्या सुमारास त्याचा आतेभाऊ राहुल गेला आणि त्याने माझ्या गाडीवरून गव्हाची थैली खाली पडल्याचे त्याला सांगितले. यावेळी दोघेही आपल्या मोटारसायकलने घराबाहेर पडलेत. शहराबाहेरील इव्हेंट सभागृहाच्या नजिक असलेल्या रिंगरोडवर दोघांच्यात अचानक वाद निर्माण झाला आणि आतेभाऊ राहुलने आपल्याकडील बंदूक मामेभाऊ हर्षलवर रोखली. यावेळी आरोपीने एक गोळी हवेत फायर केली तर दुसरी गोळी हर्षलच्या मांडीला आणि तीसरी गोळी पाठीला स्पर्श करून गेली. सदर घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच जखमी हर्षलला आधी खाजगी व त्यानंतर सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासंदर्भात सेवाग्राम पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आरोपीस अटक करून ताब्यात घेतले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर हल्ल्याला जुन्या वादाची किनार असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी अधिक तपास सेवाग्राम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीत घागे करीत आहे.

4.3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 8 4 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे