ब्रेकिंग

उभ्या एसटीला दुचाकीची धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी : मोही बसस्थानकावरील घटना

सचिन धानकुटे

सेलू : – प्रवासी उतरविण्यासाठी उभ्या असलेल्या एसटीवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज मोही बसस्थानकावर घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू येथून एम एच ४० एएन ८९९५ क्रमांकाची एसटी बस नवरगावकडे जात होती. दरम्यान मोही बसस्थानकावर प्रवासी उतरविण्यासाठी एसटी बस थांबली असताना अचानक एम एच ३२ एजी ५७९७ क्रमांकाच्या दुचाकी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत एसटी बसला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बस चालक प्रमोद हरिभाऊ नागोसे (वय५२) रा. आर्णी यांच्या तक्रारीहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे