ब्रेकिंग

तक्रार नोंदवून संदीप डुंभरे यांनी केली पेट्रोलमालकाला रुपयांची मागणी

वर्धा : पेट्रोलपंपावर कमी पेट्रोल देत असल्याचा आरोप करून त्यासंदर्भात तक्रार नोंदवून पेट्रोलपंप मालकाला धमकाविण्याचा विचित्र प्रकार आज (ता. 21) सकाळी 9.30 दरम्यान महिला आश्रम परिसरातील राजपाल पेट्रोल पंपवर अनेकांनी अनुभवला.

संदीप डुंभरे नामक दुचाकीचालकाची चालाखी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. संदीप डुंभरे यांनी यापूर्वी वर्ध्यातील दोन पेट्रोल पंपवर केला असल्याचे सुनील कायरकर यांनी त्याच वेळी बोलून दाखविले. मिटर सेट केले तर बरोबर पेट्रोल आणि मॅन्यूअलीत पेट्रोल टाकले तर कमी पेट्रोल टाकले जाते, असा आरोप या महाशयाने केली. आरोप तर केलेच शिवाय तशी तक्रार इंडियान पेट्रोलियमच्या तक्रारबुकमध्ये नोंदविली.

हा महाभाग तक्रारीनंतर निघून गेला खरा पण 15 मिनिटाने परत येऊन चक्क पैसे देत असेल तर तक्रार मागे घेत असल्याचे बोलून दाखविले. दरम्यान जमलेल्या नागरिकांपुढे मला पेट्रोल मालकाने शिवीगाळ केली, बाहेर मारण्याची धमकी दिली, असा आरोप संदीप डुंभरे यांनी केला मात्र cctv दाखविल्यानंतर नागरिकांनीच त्याला समज दिला. यावेळी जमलेल्या अनेकांनी संदीप डुंभरे याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्लाही पेट्रोल पंप मालक राजपाल यांना दिला. हा सर्व प्रकार cctv त कैद झाला असून अशा फंटर संदीप डुंभरेपासून सर्वच पेट्रोल पंप चालकांना सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे