ब्रेकिंग

ढासळलेल्या निरुपयोगी विहिरीच्या काठावरील घराचा अस्तित्वासाठी संघर्ष ; प्रशासनाचे मात्र “वड्याचे तेल वांग्यावर”

जिवीत अथवा वित्तहानी झाल्यास विहीर मालक जबाबदार ;

सचिन धानकुटे

सेलू : – गावठाणा लगतच्या शेतातील निरुपयोगी विहीर ढासळल्याने नजिकचे घर त्यात जमिनदोस्त होण्याची शक्यता तालुक्यातील रेहकी येथे निर्माण झाली. याकरिता संबंधित घरमालकाने गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाकडे दाद मागितली. परंतु यासंदर्भात प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याऐवजी “वड्याचे तेल वांग्यावर” काढण्याचा प्रयत्न होत असल्याने एकीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे, तर जिवीत अथवा वित्तहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का..? असा संतप्त सवाल घरमालकांकडून उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेहकी येथे गावाच्या अगदी टोकाला गावठाणात देविदास विठोबा भुते यांचे घर आहे. त्यांच्या अगदी घराशेजारीच अशोक रघाटाटे यांची सर्व्हे नंबर १०९/१ ही सामाईक शेती आहे. या शेतात घराशेजारीच असलेली विहीर दोन वर्षापूर्वी खचली. तेव्हापासून ती निरुपयोगी असून यावर्षी अतिवृष्टीने पूर्णतः ढासळली आहे. सदर विहीरीपासून अवघ्या पाच फुट अंतरावर भुते यांचे घर आहे. येथे आईवडीलासह सहा जणांचे वास्तव्य आहे. पावसामुळे ते घर कधीही विहीरीच्या खड्डयात सामावून जिवीत अथवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा अहवाल दस्तुरखुद्द तहसीलदार यांनी पाहणी केल्यानंतर दिला.
दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी घरमालकाने स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात दाद मागितली. परंतु त्यावर तोडगा काढण्याऐवजी घरमालकालाच पर्यायी व्यवस्था करण्याचे सुचविण्यात आले. प्रशासनाने यासंदर्भात विहीर मालक रघाटाटे यांना वारंवार सुचना तसेच स्मरणपत्र देऊन संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना करण्याचे सुचविले. परंतु सामाईक शेती असल्याने त्यांनी प्रशासनाच्या सुचनांकडे साफ दुर्लक्ष केले.
एकंदरीतच प्रशासनाची चालढकल व शेत मालकाच्या अडेलतट्टपणामुळे जिवीत किंवा वित्तहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का.. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे