ब्रेकिंग

इंटर्नाशिया इंडिया मार्केटिंग कंपनीकडून विदर्भातील युवकांची नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

इंटर्नाशियाच्या जाळ्यात अडकलेल्यांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणींचा समावेश ; कंपनीच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात फसवणूकीचा गुन्हाही दाखल

किशोर कारंजेकर

वर्धा : – उत्तर भारतातील इंटर्नाशिया इंडिया मार्केटिंग कंपनीने विदर्भातील अनेक होतकरु तरुण-तरूणींना नोकरीच्या नावाखाली गंडा घालण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या विदर्भात सुरू केला आहे. नागपूर शहरात जवळपास सहा ठिकाणी कंपनीने आपली कार्यालये थाटून दिशाभूल करणारी माहिती देत अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. परंतु इंटर्नाशिया कंपनीच्या बनवाबनवीचा पसारा आरएनएनमध्ये प्रकाशित होताच अनेकांनी कंपनीच्या थोतांडाविषयी आपली कैफियत व्यक्त केली. यात कंपनीशी निगडित असलेल्यांचाही समावेश आहे. कंपनी विरोधात सोलापूर जिल्ह्यात फसवणूकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा या भामट्या कंपनीपासून वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

उत्तर भारतातील इंटर्नाशिया इंडिया मार्केटिंग कंपनीच्या उपराजधानी नागपुरातील “घनश्याम मेहता” नामक भामट्याने वर्धा तसेच सेलू तालुक्यातील तरुणींची नोकरीच्या नावाखाली फसवणूक केली होती. यासंदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. यासंदर्भात आरएनएनने ऑगस्ट महिन्यात वृत प्रकाशित करताच कंपनी विरोधात फसवणूक झालेल्या अनेकांनी आरएनएनशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका तरुणीने तीन वर्षाआधी इंटर्नाशिया कंपनीसोबत काम केले. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर तीने मार्कीस पदापर्यंत गवसणीही घातली. परंतु कंपनीकडून कोणत्याही प्रकारची सुचना किंवा इशारा न देताच तीची आयडी गोठविण्यात आली. याविरोधात तीने आवाज उठवण्याचाही प्रयत्न केला, परंतु कंपनीच्या नागपुरातील भामट्यांनी तीला धाकदपट करून गप्प केले.
अशाच प्रकारे नागपुरातील एकाने आपल्यासह जवळपास २७ जणांना कंपनीशी जोडले. परंतु अचानक “घनश्याम मेहता” नामक भामट्याने त्यांचेही कामठी येथील तरुणीसारखीच गत केली. असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वणी येथील अनेकांसोबत घडल्याचे सांगितले जाते. त्यांनी नुकतीच आपली कैफियत व्यक्त केली आहे.
इंटर्नाशिया कंपनीच्या “घनश्याम आणि आरती मेहता” नामक उत्तर भारतीय भामट्यांनी वर्धा जिल्ह्यातील पवनूर येथील एका तरुणीला आशिष सराटे नामक टिम लिडरच्या माध्यमातून जाळ्यात ओढले. भामट्या आशिषने त्या तरुणीसह सेलू तालुक्यातील एका तरुणीला जवळपास तीन दिवस वेठीस धरले. बड्या-बड्या बाता करीत त्यांना त्यांच्या कुटुंबियामार्फत जबरदस्तीने पैसे भरायला भाग पाडले. परंतु कंपनीची बनियागीरी जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आपली त्या हरामखोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली.
अशाप्रकारे विदर्भातील अनेक तरुण-तरुणींची इंटर्नाशिया नामक भामट्या कंपनीने फसवणूक केली असून सदर कंपनीसह तीच्या दलालांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. (क्रमशः)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे