ब्रेकिंग

अपघातात दोन शिक्षक जागीच ठार

वाढोणा टी पॉईंट जवळील घटना

किशोर कारंजेकर

वर्धा : आर्वी तालुक्यातील चांदणी जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात वाढोणा वळण रस्त्यावर काल रात्री साडे सहा वाजता झाला.

विवेक चापेकर (वय 46) रा. उमरी मेघे, नारायण सदाशिव दोडके (वय 46) रा. खंडाते ले आऊट, मसाळा अशी मृत शिक्षकांची नावे आहेत. ते शाळेच्या कामानिमित्त आर्वी येथे गेले होते. सायंकाळीदुचाकीने परतीचा प्रवास करीत असताना ट्रकने ही धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा ट्रकचालक पळून गेला. आर्वी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद असून ठाणेदार भानुदास पिदूरकर हे वाहनाचा शोध घेत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे