ब्रेकिंग

संपादक रविंद्र कोटंबकार हल्ला प्रकरणातील हल्लेखोर “लाला” गजाआड

औरंगाबाद जिल्ह्यातील करमाळ्यातून घेतले ताब्यात; आरोपीस ४ मे पर्यंत पोलीस कोठडी, मुख्य सुत्रधार शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

किशोर कारंजेकर

वर्धा : – दैनिक साहसिकचे मुख्य संपादक तथा साहसिक जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रविंद्र कोटंबकार यांच्यावर सोमवार

(दि.१८) एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दत्तपूर जवळील बोगद्यात काही समाजकंटकांनी भ्याड असा प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल औरंगाबाद जिल्ह्यातील करमाळा येथून ताब्यात घेतले. रजत उर्फ लाला तभाणे (वय४०) रा. नागपूर असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याला काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संपादक रविंद्र कोटंबकार हे सोमवार (दि.१८) एप्रिल रोजी रात्री आपले कार्यालयीन कामकाज आटोपून आपल्या सेलू येथील निवासस्थानी जात होते. दरम्यान पवनार मार्गावरील दत्तपूर नजिकच्या वळणावरील बोगद्यात दहा ते बारा हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनाला अडवून त्यांच्यासह वाहनचालकावर जिवघेणा हल्ला केला. वाहनाची काचे फोडून वाहनचालकासह कोटंबकार यांना गंभीर मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा विविध संघटनांसह पत्रकार संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त करीत हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती.
पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत विविध पथकाच्या माध्यमातून आरोपींना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश काही मिळत नव्हते. शेवटी काल औरंगाबाद जिल्ह्यातील करमाळा येथून यातील एका आरोपीस मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. रजत उर्फ लाला तभाणे असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. सदर हल्ल्यातील एकच आरोपी सध्या सापडला असून इतरही हल्लेखोरांसह मुख्य सुत्रधार शोधण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर अजून कायम आहे. सदर हल्ला करण्यामागील उद्देश तसेच मास्टरमाइंड कोण..? यासंदर्भात लवकरच पोलीस शोध घेतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे