‘त्या वाघ नव्हे केवळ चित्रांमधल्या, त्या तर चित्राताई वाघ प्रत्यक्षातल्या,’ : पोळ्याच्या दिवशी वाघची समाजमाध्यमांवर धूम :
वर्धा : वर्धेकरांच्या कल्पकतेला सलामच करावा… पोळ्याच्या दिवशी 14 रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ दिवसभर भाजपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ध्यात होत्या. सुवर्ण समाजाची कन्या म्हणून वर्धेतील ढोमणे ज्वेलर्समध्ये चित्रा वाघ यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी एका स्नेह्याने त्यांच्यावर कविता तयार केली. त्यात ‘त्या वाघ नव्हे केवळ चित्रांमधल्या, त्या तर चित्राताई वाघ प्रत्यक्षातल्या,’ या शेवटच्या ओळींवर खुद्द चित्रा वाघ यांनी खळखळून हसत दाद दिली.
भारतीय जनता पार्टी वर्धेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी बाजारपेठेत संपर्क अभियान, मेरी माटी मेरा देश आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शहरातील सुवर्णकार समाजाच्या वतीने त्यांचा छोटेखानी सत्कार कार्यक्रम ढोमणे ज्वेलर्स येथे करण्यात आला. या कार्यक्रमात अनिल शेटे यांनी चित्रा वाघ यांचे कौतुक करताना
त्या रणरागिणी तेजाने झळाळलेल्या, त्या बावणकशी, संघर्षाच्या मुशीतल्या आदी शब्दांची बांधणी करत त्या वाघ नव्हे केवळ चित्रांमधल्या
त्या तर चित्राताई वाघ प्रत्यक्षातल्या! अशी कविता सादर केली. शेवटच्या ओळीत चित्रा वाघ यांनी टाळी देऊन दाद दिली.
यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली येरावार, अतुल तराळे, निलेश पोहेकर, धनंजय ढोमणे, सौरभ व अमोल ढोमणे, संजय ढोमणे, अखिल करंडे, बाळासाहेब पांढरे, प्रशांत घडे, संजय ढोमणे, मोहित उमाटे आदींची उपस्थिती होती.