गुन्हेगारी

डिझेल चोरीप्रकरणी दोघांना अटक; सेलू पोलिसांची कारवाई

सचिन धानकुटे

सेलू : – येथील पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने डिझेल चोरी केल्याप्रकरणी गणेशपूर येथील दोघांना गुरुवारी अटक केली. प्रभाकर हरिभाऊ धोपटे(वय४७) व कुशल बाळकृष्ण धोपटे(वय२१) असे अटक करण्यात आलेल्या डिझेल चोरट्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच्या बाजूला ईटाळा नजिक एस कंपनीचे काम सुरू आहे. तेथील जनरेटरच्या आतील जवळपास २० लिटर डिझेल बुधवार दि.३० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गहाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तेथीलच दोन सुरक्षारक्षकांना ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तर दिली. परंतु त्यांना पोलीसी हिसका दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून एका ड्रमसह २० लिटर डिझेल जप्त करण्यात आले.
ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक चकाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे नारायण वरठी, सचिन वाटखेडे, कपिल मेश्राम, लेखा राठोड आदि कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे