गुन्हेगारी

वाहनासह ४ लाख ३७ हजारांचा विदेशी दारुसाठा जप्त; आरोपी पसार

सचिन धानकुटे

सेलू (ता.२९) : – वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनासह ४ लाख ३७ हजारांचा विदेशी दारुसाठा जप्त केला. ही कारवाई आज मंगळवार(ता.२९) रोजी सकाळच्या सुमारास वायगांव शिवारात करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, वायगांव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रचलेल्या सापळ्या दरम्यान एम एच ३४ एएम १०७० क्रमांकाच्या स्विफ्ट कारला थांबण्याचा इशारा केला. परंतु कार चालकाने आपले वाहन न थांबवता पळ काढला. पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता वाहनचालकाने वायगांव शिवारातील एका शेतात सदर वाहन उभे करून तेथून धुम ठोकली आणि तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी सदर कारची तपासणी केली असता त्यात ऑफिसर चॉईस कंपनीच्या १३ पेट्या विदेशी दारु, बियरच्या ६५० व ५०० एमएलच्या ६० बॉटल्स, कार व एक मोबाईल असा एकूण ४ लाख ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. याप्रकरणी देवळी पोलिसांत आरोपी मुकेश जयस्वाल रा. कळंब जि. यवतमाळ विरोधात मुंबई दारुबंदी कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार निरंजन वरभे, रणजित काकडे, अभिजित वाघमारे, प्रदिप वाघ, अमोल ढोबाळे, अक्षय राऊत, अंकित जिभे आदि कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे