कृषीवार्ता

पांढऱ्या सोन्याला आज विक्रमी १३ हजार ४०० रुपयांचा भाव

आठवडाभरात क्विंटलमागे पावणेतीन हजारांची घसघशीत दरवाढ

सचिन धानकुटे

सेलू (दि.२८) : – येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेत आज पांढऱ्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी येथे कापसाला ऐतिहासिक असा १३ हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यावर्षीच्या कापसाला प्रति क्विंटलसाठी मिळालेला आजचा दर हा सर्वाधिक ठरला असून चक्क आठवडाभरातच क्विंटलमागे पावणेतीन हजार रुपयांची घसघशीत दरवाढ झाली आहे.

येथील उपबाजारपेठेत मागील आठवड्यापासून कापसाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ता. २१ रोजी प्रथमच कापसाच्या दराने येथे अकरा हजार रुपयांचा टप्पा पार केला. बुधवार ता. २३ रोजी कापसाला क्विंटलमागे पावणेबारा हजारांच्या आसपासचा दर मिळाला. गुरुवार ता. २४ रोजी कापसाने ११ हजार ७८५ रुपयांचा पल्ला गाठला. शुक्रवार ता. २५ रोजी पुन्हा कापसाच्या दरात तेजी आली आणि कापूस थेट प्रति क्विंटल १२ हजार २०० रुपयांच्या भावाने विकला गेला.
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी येथे कापसाच्या दराने परत नवा विक्रम प्रस्थापित केला असून कापसाला १३ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. येथील बाजारपेठेत लिलाव पद्धतीने कापसाला सर्वाधिक असा दर मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.
आज येथील उपबाजारपेठेत जवळपास १०० कापूस गाड्यांची आवक झाली होती. येथील बाजारपेठेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांत आंनदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे