गुन्हेगारी

मजुरीच्या मोबदल्यात पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार; आरोपी अद्याप मोकाटच

सेलू शहरातील घटनेने परिसरात खळबळ

किशोर कारंजेकर

वर्धा : – पतीच्या मजुरीचा मोबदला मागणाऱ्या पिडीत महिलेवर पतीच्या मित्रानेच बळजबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सेलू शहरातील विकास चौकात घडली. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीहून सेलू पोलिसांत आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकू शेख (वय३०) रा. विकास चौक सेलू असे “त्या” लिंगपिसाट आरोपीचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अद्याप आरोपी मोकाटच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार आरोपी रिंकू व पिडीतेचा पती हे दोघेही मित्र आहेत. पतीच्या मजुरीचा मोबदला मागण्यासाठी ती आरोपीकडे गेली होती. दरम्यान त्याने तिला मजुरीच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केली. आरोपीने तीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत दि. १५ फेब्रुवारी रोजी तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. एवढेच नाही तर सदर बाब तुझ्या पतीला सांगणार असे म्हणून तीच्यावर वारंवार अत्याचार केला. सदर नराधमाचा त्रास असह्य झाल्याने अखेर पिडीतेने शनिवारी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रिंकू शेख विरोधात भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे. परंतु आरोपी नराधम अद्याप मोकाटच असल्याने शहरात मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे