गुन्हेगारी

आजारपणाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

सचिन धानकुटे

सेलू : – सततच्या आजारपणाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोराडच्या सोनिया नगरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. काजल दादाराव उईके (वय २२) असे मृतक तरुणीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार घोराड येथील सोनिया नगरातील मृतक तरुणी ही नर्सिंगची विद्यार्थीनी होती. ती सतत आजारी असायची. सततच्या आजारपणाला कंटाळून तीने आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला. काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरातील मंडळी घरी असतानाच तीने कोणालाही न कळविता गळफास लावून घेतला. सदर प्रकार लक्षात येताच तीला स्थानिकांच्या मदतीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे