कृषीवार्ता

सेलू उपबाजारपेठेत आज कापसाला ऐतिहासिक १२ हजार २०० रुपयांचा दर

सचिन धानकुटे

सेलू (दि.२५) : – येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेत आज कापसाला ऐतिहासिक असा १२ हजार २०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यावर्षीच्या कापसाला प्रति क्विंटलसाठी मिळालेला आजचा दर हा सर्वाधिक ठरला आहे.

येथील उपबाजारपेठेत कापसाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी प्रथमच कापसाच्या दराने येथे अकरा हजार रुपयांचा टप्पा पार केला. बुधवारी कापसाला क्विंटलमागे पावणेबारा हजारांच्या आसपासचा दर मिळाला. गुरुवारी त्यात पुन्हा दोनशे रुपयांची भर टाकून ११ हजार ७८५ रुपयांचा पल्ला गाठला. आज शुक्रवारी पुन्हा कापसाच्या दरात तेजी आली असून कापूस प्रति क्विंटल १२ हजार २०० रुपयांच्या भावाने विकला गेला. येथील बाजारपेठेत लिलाव पद्धतीने कापसाला हा दर मिळाला. खापरी येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रभाकर भांडेकर यांच्या कापसाच्या गाडीला यावर्षीचा सर्वाधिक भाव मिळाला असून लिलाव पद्धतीने दफ्तरी कॉटसपीनने या कापसाची खरेदी केली.
आज येथील उपबाजारपेठेत १०० ते १२५ कापूस गाड्यांची आवक झाली होती. येथील बाजारपेठेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांत आंनदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे