कृषीवार्ता

सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्या चना खरेदीचा शुभारंभ

सचिन धानकुटे

सेलू : – येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालय तसेच उपबाजारपेठेत गुरुवारी नाफेडच्या चना खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी प्रथम काटा पूजन व त्यानंतर चना उत्पादक शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व शेला देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रेहकी येथील शेतकरी नितीन झाडे, सुरगांव येथील शेतकरी मेहता, सिंदी येथील शेतकरी बावणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी एफसीआयचे प्रमुख ठाकूर, गुजर, ग्रेडर भालकर, सिंदी शेतकी खरेदी विक्री समितीचे सभापती दिलीप गावंडे, उपसभापती अशोक कलोडे, संचालक बबनराव हिंगणीकर, युसुफ गणी शेख, प्रभाकर कलोडे, अशोकराव हिंगणीकर, प्रविण पाटील, सचिन नांदुरकर, महाविरप्रसाद तिवारी, कोपरकर, बाजार समितीचे सचिव आय. आय. सुफी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे