क्रिडा व मनोरंजन

नाट्यधर्मी हरीश इथापे व अभिनेते विजय कदम मानकरी

अवतरण अकादमी, मुंबईचे नाट्यसन्मान जाहीर, जागतिक रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार वितरण

किशोर कारंजेकर 

वर्धा :- मागील २३ वर्षांपासून राज्यस्तरावर कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या अवतरण अकादमी, मुंबईद्वारे यंदाच्या अवतरण सन्मान व पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ॲग्रो थिएटरचे संस्थापक, नाट्यधर्मी हरीश इथापे आणि ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते विजय कदम यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार, दि. २६ रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा अकादमीचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी केली आहे. 

अवतरण अकादमीद्वारे सन १९९९ पासून जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीच्या सोहळ्याची सुरूवात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने प्रसारित केलेल्या ज्येष्ठ अमेरिकन नाट्यकर्मी पीटर सेलार्स यांच्या संदेशाच्या वाचनाने होणार आहे. या कार्यक्रमात अवतरण आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येईल. समारोहात किशोर व युवा वयोगटातील मुलामुलींना निरपेक्ष आणि व्रतस्थ वृत्तीने नाट्यप्रशिक्षण देऊन कलाभिरुची निर्माण करणे आणि त्यातून व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याच्या दीर्घकालीन कार्यासाठी नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांना नाट्यधर्मी अवतरण सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. तर रंगभूमी, टी. व्ही. मालिका आणि चित्रपटाद्वारे विनोदी अभिनयाने दीर्घकाळ रसिकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना कै. दादा कोंडके अवतरण पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. 
हरीश इथापे यांना जाहीर झालेल्या या सन्मानाकरिता अध्ययन भारती, चिल्ड्रन्स थिएटर अकादमी, नाम फाउंडेशन, आधार संघटना, आम्ही वर्धेकर, विदर्भ साहित्य संघ, यशवंतराव दाते स्मृती संस्था, बिरादरी कलावृंद, जिल्हा कलोपासक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच नाट्य व सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांद्वारे अभिनंदन करण्यात आले आहे. 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे