राजकिय

सेलू तालुक्यातील युवकांसह विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

सचिन धानकुटे

सेलू : – येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सेलू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील अनेक युवकांसह विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवार(ता.२२) रोजी पक्षप्रवेश करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष मोठा व्हावा, प्रत्येक गावात शाखा असाव्यात आणि येत्या अनेक निवडणुकीत पक्षाला आपली ताकद दाखविता यावी, यासाठी जवळजवळ ३२ युवक, तरुण व विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी अक्षय कावळे यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज वैद्य यांनी महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली. नव्यानेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविलेल्या मृणाल चापडे या तरुणाने अथक परिश्रम करीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम घडवून आणला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज वैद्य, तालुकाध्यक्ष रामू पवार, शहराध्यक्ष हनिफभाई सय्यद, जिल्हा संघटक सचिन ठाकरे, पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष निखील बुटे, प्रणय कदम, तालूका उपाध्यक्ष अक्षय कावळे, नरेश खोडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे