Breaking
ब्रेकिंग

सात जणांच्या टोळक्याने सेलूच्या डॉक्टरसह तीघांना मारहाण करीत केली लूटमार ; पवनार ते वरुड रस्त्या दरम्यानची घटना

1 9 5 8 6 9

सचिन धानकुटे

सेलू : – येथील एका डॉक्टरसह कामावरून घरी परत येणाऱ्या पवनार येथील तीघांना सात जणांच्या टोळक्याने जबर मारहाण करीत त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम हिसकावून पळ काढल्याची घटना काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास पवनार ते वरुड दरम्यान घडली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.

सेलू येथील डॉ किरण वांदिले हे सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या अस्थीरोग विभागात कार्यरत असून ते काल रात्री आपल्या दुचाकीने पवनार-वरुड मार्गे सेवाग्रामला जात होते. दरम्यान रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास खेलकर यांच्या शेताजवळ त्यांना सात जणांच्या टोळक्याने अडवून धरत त्यांच्याकडील सहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना ताजी असतानाच एमआयडीसी येथील मिनरल वॉटर बॉटल कंपनीत काम करणाऱ्या पवनार येथील सचिन मनोहर येरुणकर(वय३०), रितेश श्रावण बुरबादे(वय२०) व गौरव महेंद्र बोबडे(वय२२) या तिघांना अडविण्यात आले. यावेळी त्यांनी सचिन येरुणकर ह्याच्यावर हल्ला चढविला आणि त्याच्या मांडीवर चाकूने तीन वार केलेत आणि यात बळजबरीने त्याच्याकडील सात हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर गौरव बोबडे ह्याचा मोबाईल हिसकावून घेत त्याच्या हाताच्या बोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. रितेश बुरबादे ह्याला सुद्धा मारहाण करण्यात आली परंतु त्याने आपला मोबाईल फेकून दिल्याने हल्लेखोरांच्या हाती काही लागले नाही.
यातील हल्लेखोर हे काळ्या व पांढऱ्या रंगाच्या अशा दोन वेगवेगळ्या गाड्यांनी आल्याचे सांगितले जाते. यातील एक मराठी व अन्य हिंदी भाषेत शिवीगाळ करीत असल्याची माहिती असून त्यांनी गांजा व दारु ढोसल्याचे सांगितल्या जाते. सदर घटनेनंतर सातही हल्लेखोर पवनारच्या दिशेने निघून गेल्याने जखमी युवकांनी सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली.
याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

3.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 5 8 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे