राजकिय

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य शिवसेनेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम

किशोर कारंजेकर 

वर्धा :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (तिथीनुसार)निमित्ताने दि.२१ मार्च रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमाने अध्यक्ष जिल्हाप्रमुख अनिल देवतारे तर प्रमुख पाहुणे युवासेना विस्तारक राज दिक्षित, वर्धा विधानसभा संपर्कप्रमुख गणेश टोने,महिला आघाडी जिल्हा संघटिका,वंदना भुते,उपजिल्हा प्रमुख रविंद्र कोटंबकर, जिल्हा समन्वयक राजेंद्र किटे,तालुका प्रमुख गणेश इखार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवाजी महाराजांच्या इतिहासासाला उजाळा देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण आरंभ इव्हेंट ऑर्गनायझेशन द्वारा करण्यात आले आहे.
मोटारसायकल रॅलीने कार्यक्रमाला सुरुवात होणार असून मोठया संख्येने महिलाचा सांस्कृतिक पेहरावात सहभाग असणार आहे. तसेच पुरुष केशरी कुर्ता परिधान करून शेकडो शिवसैनिक भगव्या रॅलीत सहभागी होणार आहे. रॅलीची सुरुवात सायंकाळी ४ वाजता कारला चौकातून होणार असून आर्वी नाका, पावडे चौक, शास्त्री चौक, बजाज चौक मार्गे शिवाजी चौकात समारोप होणार आहे. रॅली दरम्यान विविध रंगाचे फवारे चे सादरीकरण, सांस्कृतिक देखावे तसेच शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळा परिसरात प्रार्थना,गर्जना,आरती व ढोल ताश्याच्या गजरात रंगबिरंगी रांगोळीच्या राशीत दिव्यांची रोषणाई व पारलाईटच्या प्रकाशात गुलालाची उधळण करत सजावट केलेल्या तोफांनी महाराजांच्या पुतळ्याला फुलांची सलामी देऊन उपस्थित पाहुण्याच्या हस्ते अश्वरुढ महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.यावेळेस मोठया प्रमाणात अन्नदान करण्यात येणार आहे. शिवसेनेने आयोजित छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवात मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अँड उज्वल काशीकर उपशहर प्रमुख किशोर लाखे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अधिकारी आसिफ शेख निवासी उपजिल्हा प्रमुख अभय अमृतकर प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे तसेच महिला आघाडीच्या तालुका संघटिका भारती कोटंबकर,शहर संघटिका माया गारसे,उपतालुका प्रमुख प्रदीप मस्के, प्रविण वरमकर, राजू पेटकर, निलेश वैद्य, प्रमोद पांडे, राजेंद्र चाफले,बाळा साटोने,अनिकेत जगताप, माणिक बारई,दिनेश वानखेडे भगवान सहारे, प्रताप शेंडे, भूषण बावनकर,शेखर वाळके, नितीन वंजारी, पप्पू मुडे आदिसहित युवासेना,युवती सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे