Breaking
ब्रेकिंग

ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या सरपंचाला दोन वर्षाचा कारावास

1 9 7 0 7 1

सचिन धानकुटे

वर्धा : – ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या सरपंचाला दोन वर्षाच्या सश्रम कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा काल शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावण्यात आली. सुशिल जनार्दन वडतकर (वय४२) रा. वडद असे “त्या” सरपंच महोदयांचे नाव आहे.

       प्राप्त माहितीनुसार, वडद येथील जिल्हा परिषद शाळेचा वीजपुरवठा बिल न भरल्याने सन २०१९ मध्ये खंडित करण्यात आला होता. परंतु याच काळात सदर शाळेमध्ये मतदान केंद्र असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे होते. याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी कार्यालयात ग्रामसेवक यांना बोलावण्यात आले होते. या अनुषंगाने ग्रामसेवक गटविकास अधिकारी कार्यालयात नोटशीट फाईल घेऊन पोहचले. परंतु त्यावर सरपंच महोदयांची स्वाक्षरी हवी असल्याने ते त्यांच्याकडे गेले. परंतु सरपंच यांनी स्वाक्षरी करण्यास नकार देत ग्रामसेवक यांच्याशी वाद घातला. प्रकरण चांगलेच हातघाईवर आले आणि सरपंच वडतकर यांनी ग्रामसेवक यांना चप्पल तसेच लाथाबुक्कयांनी मारहाण केली.

     याप्रकरणी ग्रामसेवक यांच्या तक्रारीहून लोकसेवकाच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करीत त्यांना जाणीवपूर्वक दुखापत केल्याप्रकरणी सरपंच वडतकर ह्यांच्यावर शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी तपास करीत आरोपी सरपंचा विरोधात सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने गुन्हा दाखल करून घेत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यात जवळपास ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकारी अभियोक्ता म्हणून एच पी रणदिवे यांनी कामकाज सांभाळले तर साक्षदारांना न्यायालयात हजर करण्यासाठी सुजित पांडव व देवेंद्र कडू यांनी मोलाची कामगिरी बजावली. यातील फिर्यादी, साक्षदार व सरकारी अभियोक्त्यांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हि पी आदोने यांनी आरोपी सरपंच सुशिल वडतकर यांना दोन वर्षाच्या सश्रम कारावाससह पाच हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा काल शुक्रवारी सुनावली.

3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे