ब्रेकिंग

अपघातात रसुलाबादचे दोन तरुण जागीच ठार

आर्वी पुलंगाव रोडवर नादुरुस्त टिप्परला मोटरसायकलची धडक

किशोर कारंजेकर 

वर्धा :- आर्वी – पुलंगाव रोडवर समाज कल्याण होस्टेलच्या समोर एक रेतीने भरलेला टिप्पर क्र.एम एच 32 Q 7007 सकाळपासून नादुरुस्त होता. त्या टिप्परला पुलंगावकडून येणारी मोटरसायकल क्र. mh 32 AR 2256 या गाडीने सरळ मागून टिप्परला धडक दिली. या अपघातात दोघेही जाग्यावरच ठार झाले. दोघेही रसुलाबाद येथील असून सचिन उमेश कणेरी वय 27, सूरज किशोर ढोले वय 25 हे जाग्यावरच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की टिप्परच्या मागच्या चाकामध्ये मोटरसायकलचा समोरचा चक्का फसल्याने अक्षरशः ट्रॅक्टर च्या साहाय्याने मोटरसायकल काढण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच रसुलाबाद येथील सरपंच राजेश सावरकर, पोलीस पाटील तसेच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती पुलंगाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली. लगेच पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेश शेळके स्वतः कर्मचारीसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी लोकांची खूप गर्दी झाली होती.
घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पुलंगाव येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. पुढिल तपास पुलंगाव पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे