ब्रेकिंग

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; अनियंत्रित क्सयूव्ही पुलाखाली पडल्याने सात जणांचा जागीच मृत्यू

मृतकात तिरोडा येथील आमदार पुत्राचाही समावेश : सेलसुरा येथील घटना 

किशोर कारंजेकर

वर्धा : – येथील सावंगी (मेघे) वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर काल रात्री दिड वाजताच्या सुमारास काळाने घाला घातला. त्यांची अनियंत्रित महिंद्रा एसयूव्ही थेट नदीच्या पात्रात पडल्याने यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातात तिरोडा येथील आमदार पुत्राचाही समावेश आहे. हा अपघात रात्री दिड वाजताच्या सुमारास सेलसुरा नजिक घडला.

प्राप्त माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विविध भागातून विद्यार्थी येतात. यातीलच एमबीबीएस अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे सहा व त्यांचा मित्र अविष्कार असे सगळे रात्री उशिरा वाढदिवसाच्या निमित्ताने फिरायला गेले. सगळे मित्र एका एसयूव्हीने सांवगीवरुन यवतमाळच्या दिशेने निघाले. दरम्यान सेलसुरानजिक भरधाव एसयूव्हीवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट नदीच्या पात्रात पडली. हा अपघात रात्री दिड वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात एसयूव्ही अक्षरशः चेंदामेंदा झाली व त्यात बसून असलेल्या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार यासह निरज चव्हाण, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युष सिंग, शुभम जयस्वाल, पवन शक्ती आदि एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील नितेश सिंग हा वाहन चालवत असल्याची माहिती आहे. सदर अपघातानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने अपघाताची माहिती सावंगी पोलिसांना दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले व मदतकार्य सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत मदतकार्य सुरू असल्याची माहिती आहे. सदर अपघातामुळे मेडिकल क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे