Breaking
ब्रेकिंग

सेलू येथे रविवारी आरोग्य संकल्प अभियान : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम ; मोफत रोग निदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषधीचेही वितरण

1 8 2 0 5 5

सचिन धानकुटे

सेलू : – डॉ. अभ्युदय मेघे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंगी(मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालयाच्या परिसरात रविवारी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मोफत भव्य रोग निदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रविवार(ता.१७) रोजी सकाळी १०.३० वाजता राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ताजी मेघे तर विशेष अतिथी म्हणून मृद् व जलसंधारण मंत्री संजय राठोड तर विशेष अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, आमदार बच्चू कडू, आमदार अशोक उईकें, दमेउशि. संशोधन संस्थेचे प्रधान सल्लागार सागर मेघे, वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर मेघे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, वर्धा जिल्हा भाजपा महामंत्री अविनाश देव, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव, नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, उपनगराध्यक्ष रेखा खोडके, सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, दत्ता मेघे संशोधन संस्थेचे कुलगुरू डॉक्टर ललितभूषण वाघमारे, दत्ता मेघे संस्थेचे प्रकुलगुरू गौरव मिश्रा, कुलसचिव डॉक्टर श्वेता काळे पिसुळकर आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असणार आहे.

    सदर शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीकारी डॉ. चंद्रकांत महाकाळकर यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 8 2 0 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे