महाराष्ट्र

आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या सरपंचाची हकालपट्टी करा

जिल्हा परिषद समोर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सचिन धानकुटे

सेलू : – लसीकरण करणाऱ्या आरोग्य पथकाला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या सरपंचाला पदमुक्त करीत हकालपट्टी करावी तसेच मारखुंड्या सरपंचावर कायदेशीर कारवाई करावी, याकरिता आज आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदे समोर कामबंद आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नरखेड तालुक्यातील खंडाळा येथे काल दि. ४ जानेवारीला १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाकरिता आरोग्य चमू उपस्थित होती. दरम्यान १५ लाभार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर येथील सरपंच मुंदाफळे अचानक तेथे प्रगटले. त्यांनी कुणाच्या परवानगीने लसीकरण घेताय यावरून उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच प्रविण धोटे आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र भिष्णूर व कोविड लसीकरण गाडीचे वाहनचालक यांना मारहाण देखील केली. यासोबतच आरोग्य सेविका गजबे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यासंदर्भात डॉ किशोर ढोबळे यांनी सरपंच मुंदाफळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनासुद्धा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली.
आरोग्य कर्मचारी हे आरोग्य सेवेत स्वतः सह कुटूंबाचे जिव धोक्यात घालून काम करीत आहे. त्यांना लोकप्रतिनिधींकडून अशाप्रकारे वागणूक मिळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष पसरला आहे.
“सरपंच वादाफळे यांना तात्काळ पदमुक्त करीत त्यांची तुरुंगात रवानगी करावी” अशी मागणी महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच आरोग्य सेवेचे काम करताना संरक्षण उपलब्ध करुन देण्यात यावे, अन्यथा नाईलाजाने महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचारी संपूर्ण काम बंद करतील याची नोंद घ्यावी. नरखेड येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आज वर्धा जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन करीत जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रविण वेदपाठक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे, कार्याध्यक्ष वंदना उईके, सचिव दिपक कांबळे, उपाध्यक्ष संजय डफरे, सुजाता कांबळे, विजय जांगळे, बाबाराव कन्हेर, गजानन थुल, पुजा वैद्य, विनोद भालतळक
गणेश निमजे, अक्षय इंगळे, तृष्ती देशमुख, शैलेश मिश्रा, नितेश चपटे, प्रकाश रंगारी, विणा धनविज, दिपाली कडू, निलेश साटोणे, विकास माणिककुळे, संगीता रेवडे, मँग्मो अध्यक्ष डॉ सचिन बेले, सचिव माधुरी दिघीकर आदि कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे