संपादकीय

आफताब खान शास्त्री गौरव पुरस्काराने सन्मानित

“कामगार क्षेत्रात आफताब खान यांचे योगदान उल्लेखनीय”- मोहन अग्रवाल

हिंगणघाट:- “कामगार व सामाजिक क्षेत्रात आफताब खान यांचे नांव वर्धा जिल्ह्यात आदराने घेतले जात असून त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सातत्याने केले आहे. नव्या पिढीस चांगले कार्य करणाऱ्यांची माहिती होणे व त्यापासून प्रेरणा मिळणे आवश्यक असते. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा झरा दिवसेंदिवस कमी होत असून स्वार्थ आणि संकुचित जगात जगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अश्या परिस्थितीवर मात करून सकारात्मक कार्य आफताब खान करत आहे. हे खरच प्रशंसनीय आहे. कामगार क्षेत्रात आफताब खान यांचे कार्य उल्लेखनीय आहे” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल यांनी व्यक्त केले.

ते जाम येथील हॉटेल अशोका येथे ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम आणि मित्र परिवार द्वारा आयोजित शास्त्री गौरव पुरस्कार सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

सोहळ्याचा उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाटचे सभापती, माजी नगराध्यक्ष व वरिष्ठ कामगार नेते एड. सुधीर बाबू कोठारी यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष एड. एम. एम. व्यास, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व वरिष्ठ समाजसेवी इमरान राही, कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूरचे सभापती हिम्मतभाऊ चतुर, जयहिंद सेवाभावी संस्थेचे जिलाध्यक्ष आर. एस. लभाने, समाजसेवी फिरोज खान, शाकीर खान पठाण, डॉ. सलीम बख्श, मोरबी टाईल्सचे काझी अजीजुद्दीन, एड. इब्राहीम बख्श, शाहीन भाई, असद खान उर्फ मुन्ना भाई, शेख सरफू, नगरसेवक राजू चाफले, नगरसेवक सतीश धोबे, नगरसेवक मनीष देवढे, नगरसेवक धनंजय बकाणे, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटक एड. सुधीरबाबू कोठारी म्हणाले कि, समाजात वाईट काम करणाऱ्यांची माहिती लवकर मिळते परंतु चांगले कार्य करणाऱ्यांची ओळख होण्यास बराच वेळ लागतो. आज समाजाला आफताब खान सारखे निष्ठावंत आणि झुझारू लोकांची गरज आहे. इमरान राही म्हणाले कि, समाजसेवा प्रामाणिकपणे करणारे फारच कमी लोकं असतात. इंटकचे महासचिव पदाची गरिमा राखून आफताब खान यांनी कामगारांसाठी न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. एड. व्यास म्हणाले कि, आफताब खान हे अनेक समस्यांचा सामना करत पुढे आलेले असून युवा पिढीसाठी एक आदर्श आहे.

यावेळी कामगार व दुर्बल घटकांचे कैवारी, सर्व धर्म समभावच्या भावनेला वृद्धिगत करणारे व सेवाभावी आफताब खान यांचा शाल, श्रीफळ, पुष्प्गुच्छ आणि स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आले.

या सोहळ्यात यशवंत टपाले, बिपीन पटेल, हाजी झाकीर भाई, हाजी अक़िल भाई, आदिल आझमी, प्रा. फारीश अली, अश्फाक खान, नितीन जैस्वाल लोणारे, लाला सांगानी, समीर बख्श, अली भाई, असलम खान, एड. अर्शी, मजाज कुरैशी, डॉ. अनिस बेग, रफत खान, कय्युम सर, कुशल सरकार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना असद खान उर्फ मुन्ना भाई यांनी ठेवली, प्रख्यात सूत्र संचालक एड. इब्राहीम बख्श आजाद यांनी आपल्या विशिष्ठ शैलीत सूत्र संचालन केले आणि आभार शाकीर खान पठाण यांनी मानले. सोहाळ्यात हिंगणघाट, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर येथील मित्रगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 

एड. इब्राहीम बख्श आजाद
L

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे