राजकिय

मोहन येरणेच बोरगाव (मेघे)चे उपसरपंच

अविश्वास ठराव बारगळला

किशोर कारंजेकर

वर्धा :- बोरगाव मेघे ग्रामपंचायतच्या 13 सदस्यांनी सादर केलेला अविश्वास ठराव आज बारगळला. स्वाक्षरी केलेला एक सदस्य गैरहजर राहिल्याने आता मोहन येरणेच बोरगावचे उपसरपंच राहणार आहे.

सरपंच संतोष सेलूकर यांनी उपसरपंच मोहन येरणे यांच्या बाजूने मतदान केल्याने सर्व सदस्यात चांगलाच संभ्रम झाला होता. अविश्वासाचा प्रस्ताव सरपंच सेलूकर यांनीच दाखल करायला लावला असतांना मतदान मात्र मोहन येरणे यांना केल्याने हा प्रकार म्हणजे गावांत भांडणे लावण्याचा असल्याचा आरोप सदस्य विजय रामटेके यांनी सभागृहात बोलून दाखविला. देवानंद दाखणे, नितीन डफरे, मनोज चौधरी, युनूस खा पठाण, नीलिमा कटाईत, पूनम भोयर, साधना वासनिक, योगिता कामडी, विभा ठोंबरे, प्रताप शेंडे, आरती मडावी, शारदा तडस, विजय रामटेके या 13 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता मात्र यातील देवानंद दखणे गैरहजर राहिल्याने मोहन येरणे आपल्या पदावर कायम राहणार आहे.

गैरहजर राहिलेले देवानंद दखणे यांनी विरुद्ध पार्टीकडून मोठ्या रकमेची उचल केल्याने सभागृहात गैरहजर राहिले असा आरोप युनूस खा पठाण यांनी केला असून या अविश्वास प्रस्तावात ग्रामपंचायत सदस्यात मोठा घोडेबाजार चालला असल्याचेही युनूस पठाण म्हणाले.

तहसीलदार रमेश कोडापे यांनी ही प्रस्ताव प्रक्रिया पार पाडली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस पाटील गणेश देवढे यांची ही यावेळी उपस्थिती होती.

9168829353

9579712774

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे