गुन्हेगारी

बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार

- वर्ध्याच्या वनविभागाची मोठी कारवाई

*वर्धा*

– बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना अटक; एक फरार

– वर्ध्याच्या वनविभागाची मोठी कारवाई

– वनविभागाने चामडे केले जप्त

वर्ध्यात बिबट्याच्या चामड्याची तस्करी करताना चौघांना रंगेहात पकडले, वर्धा वन विभागाने ही कारवाई केली आहे, त्यांच्याकडून बिबट्याचे संपूर्ण चामडे जप्त करण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. यात एक जण फरार झाला आहे.
वर्धा शहराच्या मुख्य बाजारपेठ येथील महादेवपुरा येथे आंबेडकर उद्यानजवळ बिबट्याच्या चामड्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. मध्यरात्री  वनविभागाने सापळा रचून तस्करी होताना आरोपींना रंगेहात पकडले. बिबट्याच्या चामड्याचा 30 कोटी रुपयात सौदा झाल्याची माहिती आहे. बिबट्याच्या चामड्याच्या तस्करीत एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आले. एक आरोपी फरार असल्याची वनविभागाने सांगितले आहे. बिबट्याच्या चांमड्यांची तस्करी प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तस्करी प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे