महाराष्ट्र

रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी पवनार सर्कलच्या युवा आघाडी अध्यक्षपदी शेषराव भगत यांची नियुक्ती

महेंद्र मुनेश्वर

वर्धा:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण

दिना निमित्ताने वर्धा तालुक्यातील सतोडा गावामध्ये अभिवादन सभा घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे वर्धा जिल्हा तथा विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर हे होते.महामानव संविधान निर्माते डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करुन रिपाइं नेते महेंद्र मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाने रिपाइं (ए) चे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष कैलास इंगळे यांनी पवनार जिल्हा परिषद सर्कल रिपाइं (आंबेडकर) च्या युवा आघाडी अध्यक्षपदी आंबेडकरी कार्यकर्ते शेषराव भगत यांची निवड केली.रिपाइं (ए) जिल्हा युवा आघाडीचे महासचिव अंकीत रामटेके व सतोडा येथिल आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत कैलास इंगळे यांनी शेषराव भगत यांना नियुक्ती पत्र दिले.

संविधान निर्माते डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक व राजकीय क्रांतीच्या विचाराने रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाच्या पवनार सर्कल अध्यक्षपदी,राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये व राष्ट्रीय महासचिव डा मोहनलाल पाटील,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाने शेषराव भगत यांची निवड आज डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करुन महापरिनिर्वाण दिनी करित आहे.असे रिपाइं (आंबेडकर) चे विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर अध्यक्षीय प्रतिपादनातून म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे