Breaking
ब्रेकिंग

नोकरीच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक ; युवकास ६४ हजार ७५० रुपयांचा लावला चुना

1 8 2 0 4 9

सचिन धानकुटे

वर्धा : – नागपूर विमानतळावर सुरक्षा रक्षक पदासाठीचे आमिष दाखवत शहरातील एका युवकाची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची तक्रार सायबर पोलिसांत दाखल करण्यात आली. यातील युवकाला फोन-पे द्वारे जवळपास ६४ हजार ७५० रुपयांचा गंडा घालण्यात आला.

शहरातील स्वागत कॉलोनी, डाफे ले-आऊट, कारला चौक येथील रहिवासी सतिश ज्ञानेश्वर किरनाके (वय३२) नामक युवकाने नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर सुरक्षा रक्षक पदासाठीची जाहिरात एका फेसबुक पेजवर बघितली होती. सदर जाहिरातीतील ९८१३०४८९०२ या फोन क्रमांकावर फोन केला असता, समोरच्या व्यक्तीने सुरक्षा रक्षक पदभरती असल्याचे स्पष्ट केले. युवकाने सदर व्यक्तीच्या आमिषाला बळी पडत त्याला वेळोवेळी ८५२९५८१७७० या फोन क्रमांकावर फोन-पेच्या माध्यमातून जवळपास ६४ हजार ७५० रुपये भरण्यासाठी सांगितले. परंतु नोकरी तर मिळाली नाही, मात्र आपले पैसेही गेल्याचे लक्षात येताच, सदर युवकाने सायबर पोलीस स्टेशन गाठून यासंदर्भात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सायबर पोलीस करीत आहे.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 8 2 0 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे